Ad will apear here
Next
प्राणिप्रेमी करणार वन्यजीवगणना
प्रातिनिधिक फोटोठाणे : प्राणिप्रेमींतर्फे वन्यजीवगणनेचा कार्यक्रम आज, १० मे रोजी ठाण्यात राबवला जाणार आहे. ठाण्यातील येऊर, तुंगारेश्वर अभयारण्य, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या अभयारण्यांमध्ये त्यासाठी जवळपास ५० मचाणे उभारण्यात आली आहेत. सोडत पद्धतीने या उपक्रमातील निरीक्षकांची निवड करण्यात येते. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून उद्या सायंकाळी पाचपर्यंतच्या २४ तासांत ही वन्यजीवगणना पार पडेल. 

दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिप्रेमींतर्फे वन्यजीवांची गणना केली जाते. बुद्धपौर्णिमा साधारण मे महिन्यात येते. जंगलामधील बरेचसे पाणवठे या काळात आटलेले असतात. ज्या मोजक्या पाणवठ्यांमध्ये पाणी असते, तेथे हमखास प्राणी, पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. उन्हाळा आणि पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश यांचा योग्य मेळ साधून या दिवसाची निवड प्राणिगणनेसाठी करण्यात आली आहे. या पौर्णिमेला चंद्राचा प्रकाशही वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेने सर्वाधिक असतो.

मचाणयासाठी वन विभागातर्फे पाणी असलेल्या पाणवठ्यांजवळ तात्पुरती मचाणे बांधली जातात. इच्छुक प्राणिप्रेमी, प्राणिनिरीक्षक मचाणांवर प्रत्यक्ष २४ तास राहून पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांची नोंद ठेवतात. वन विभागातर्फे प्राण्यांची गणना करण्यासाठी जंगलामध्ये असलेल्या प्राण्यांची यादी प्राणिप्रेमींना दिली जाते व पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांनुसार त्या यादीमध्ये संख्या भरणे अपेक्षित असते. ही खरे तर वन्यजीवांची गणना करण्याची जुनी पद्धत आहे. हल्ली अनेक ठिकाणी पाणवठ्याजवळ कॅमेरा लावूनही ही गणना करता येऊ शकते.

'वन्यजीवांची आवड असलेल्यांना केवळ याच निमित्ताने दिवसभर जंगलातील मचाणावर बसून प्राणी न्याहाळायची संधी मिळते. अनेक वन्यजीवप्रेमी वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. इतक्या उन्हाळ्यात खरे तर दिवसभर अशा मचाणावर शांत बसणे अवघड वाटले असते; पण आपल्या पाणवठ्यावर एखादा वाघ किंवा बिबट्या पाणी पिताना दिसल्यानंतर या साऱ्या मेहनतीचे सार्थक झाल्याचा आनंद या प्राणिप्रेमींना मिळतो. हा आनंद वन्यजीवप्रेमींना मिळावा यासाठी ही पद्धत अजूनही वन विभागाने चालू ठेवली आहे,' अशी माहिती बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे  सहायक वन संरक्षक मोहन नाईकवाडी यांनी दिली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZQPBC
Similar Posts
ठाण्यातील अभयारण्यांत सात बिबटे ठाणे : येऊर, तुंगारेश्वर, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या ठाण्यातील चार अभयारण्यांमध्ये सात बिबटे आणि ३९२ चितळे असल्याचे आढळून आले आहे. १० मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिप्रेमींतर्फे राबवण्यात आलेल्या वन्यजीवगणनेवेळी आढळलेल्या प्राण्यांची आकडेवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी जाहीर केली आहे
प्राण्यांसाठी केले पाणवठे स्वच्छ ठाणे : वन विभागाने येऊर जंगलातील नैसर्गिक झरे आणि पाणवठे स्वच्छ केल्यामुळे कडाक्याच्या उन्हातही प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. इतक्या भीषण उन्हातही येथील प्राण्यांना उष्णतेच्या झळा जाणवल्याच्या घटनेची कोणतीही नोंद नसल्याची माहिती वन विभागाने दिली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने,
कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे ‘करू या देशाटन’ या सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आदी परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे...
‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य’ ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language